Ad will apear here
Next
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार
लक्ष्मी डेबरे यांचा सत्कार करताना महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना एकबोटे आणि इतर मान्यवर.

पुणे :
विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

एक दिवसाच्या मुलीला कपड्यात गुंडाळून गळ्याला फास लावून कचऱ्यात टाकण्यात आले होते. लक्ष्मी डेबरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी तिला जीवदान दिले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या पुढाकारातून महिला बालकल्याण समितीच्या वतीने नगरसेविका नीता दांगट, मनीषा लडकत, स्वप्नाली सायकर, सुजाता शेट्टी व शीतल सावंत यांच्या उपस्थितीत या महिलांचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मी डेबरे, मंगल जाधव यांच्यासह आरोग्य निरीक्षक सुनील डमाळे, सहायक आरोग्य निरीक्षक अमोल मस्के, संदीप पवार, मुकादम सुरेखा वाघमोडे, सचिन सकट यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. 

प्रा. ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, ‘शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचे मनही निर्मळ आणि मोठे आहे हे या घटनेवरून दिसले. माणुसकीला जिवंत ठेवून सर्वांना अभिमान वाटावा असे काम लक्ष्मीबाईंनी केले आहे. अवघ्या एक दिवसाच्या अर्भकाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढून त्यांनी जीवनदान दिले आहे. लक्ष्मीताईंमुळे त्या बाळाला नवे जीवन मिळाले असून, अशी घटना मने जिवंत असल्याचे दाखवून देते.’

लक्ष्मी डेबरे म्हणाल्या, ‘कचरा समजून बोचके बाजूला टाकले; मात्र त्यात हालचाल होत असल्याने संशय आला. म्हणून उघडून बघितले तर आतील दृश्य पाहून डोळ्यात पाणी तरळले. एक दिवसाच्या अर्भकाला अतिशय वाईट पद्धतीने कापडात गुंडाळून टाकण्यात आले होते. एका जिवाला वाचवल्याचे समाधान आणि आनंद आहे. कचरा वेचणाऱ्यांनी कचऱ्यात दुसरे काही नाही ना याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.’

या वेळी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, समाज विकास विभाग उपायुक्त सुनील इंदलकर, नगरसचिव सुनील पारखी, उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे, सामान्य प्रशासन उपायुक्त अनिल मुळे, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी दीपक माळी, समाज कल्याण उपअधीक्षक संजय रांजणे, उज्ज्वला ठाणगे यांच्यासह महापालिकेतील अनेक अधिकारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZFGCH
Similar Posts
कुटुंबाच्या सहकार्यानेच प्रगतीची शिखरे गाठली; मान्यवर ‘मायलेकीं’चा सूर पुणे : ‘स्त्रीला मुलगी, पत्नी, आई अशा अनेक भूमिकांमधून जावे लागते. त्यामुळे घरून सहकार्य मिळाले नाही, तर बाहेर काही काम करणे शक्य होणार नाही. आम्हाला माहेरून आणि सासरहूनदेखील पाठिंबा मिळाल्याने इथपर्यंत पोहोचू शकलो,’ असा सूर नृत्य, गायन, मेकअप क्षेत्रातील मान्यवर महिलांनी व्यक्त केला. पुण्यातील हिंदू
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
जेनेट, रामेश्वरी, अभिलाषा ठरल्या ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ पुणे : व्हाईट डिव्हाईन इव्हेंट्सच्या वतीने आयोजित ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०१९’ या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या जेनेट अग्रवाल (इटर्नल ब्युटी), पुण्याच्या रामेश्वरी वैशंपायन (मिसेस) आणि चाळीसगावच्या अभिलाषा जाधव (मिस) यांनी पटकावले, तर इटर्नल ब्युटी प्रकारात औरंगाबादच्या स्वाती चव्हाण,
‘आई कुठे काय करते’ : आईच्या भावविश्वाचा वेध घेणारी नवी मालिका पुणे : व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language